आधुनिक विचारांचं व्यासपीठ म्हणजे संत गाडगेबाबा

Sadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

आधुनिक विचारांचं व्यासपीठ म्हणजे संत गाडगेबाबा

– प्राचार्य दत्तात्रय जाधव

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेज मध्ये विशेष कार्यक्रम

हडपसर : ” 19 व्या शतकात एकही दिवस शाळेत न गेलेले परंतु जीवनाच्या शाळेत शिकलेले,अंधश्रद्धा,रूढी,परंपरा यांना फाटा देणारे,देव देवळात नाही,दगडात नाही तर माणसात आहे असे सांगणारे आधुनिक काळातील संत म्हणजे गाडगेबाबा.साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

संत गाडगेबाबा यांनी गावांची स्वच्छता करता-करता ,लोकांच्या डोक्यातील वाईट विचार,अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले.त्यामुळे संत गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने आधुनिक विचारांचे व्यासपीठ होते,असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव , साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.

माणसात देव शोधणारे संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजमधील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने , ढोकरे वैभव,चव्हाण पृथ्वीराज या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर शिक्षक मनोगतात विद्या काटकर व रविंद्र भोसले यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.

रविंद्र भोसले यांनी संत गाडगेबाबा यांचा समग्र जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. व संत गाडगेबाबा यांचे स्वच्छतेचे कार्य,अंधश्रद्धा निर्मूलन कार्य स्पष्ट केले. व संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा वसा व वारसा आपण पुढे चालवावा असा संदेश दिला.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, कुमार बनसोडे,माधुरी राऊत, आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल वाव्हळ यानी केले.सूत्रसंचालन प्रतिश केंगले यांनी केले.तर आभार चित्रा हेंद्रे यांनी मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *