India lead by 87 runs over Bangladesh in the first innings
ढाका इथं दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची बांग्लादेशावर ८७ धावांची आघाडी
ढाका: भारत आणि बांग्लादेश यांच्यात ढाका इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं पहिल्या डावात बांग्लादेशावर ८७ धावांची आघाडी घेतली.
आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं कालच्या बिनबाद १९ धावांवरून आपला पहिला डाव पुढे सुरू केला, मात्र अवघ्या १३ धावांची भर घालून भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले.
त्यानंतर आलेले पुजारा आणि कोहली हे दोघेही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. अय्यर आणि पंत यांनी प्रतिआक्रमणाने सुरुवात केली आणि नंतर बांगलादेशच्या एकूण धावसंख्येच्या पुढे भारताचा धावसंख्या कायम राखली ऋषभ पंत आणि आणि श्रेयस अय्यर यांनी पाचव्या गड्यासाठी १५९ धावांची भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.
ऋषभ पंत शेवटी १०४ चेंडूत९३ धावांवर बाद झाला आणि ९० च्या दशकात त्याच्या कारकिर्दीत सहाव्यांदा बाद झाला. अय्यरचे शतकही हुकले तो
१०५ चेंडूत ८७ धावा करून बाद झाला.
ऋषभ पंत बाद झाल्यावर भारताचे उरलेले पाच फलंदाज ६१ धावांत माघारी परतल्यानं भारताचा पहिला डाव ३१४ धावांवर आटोपला.
बांग्लादेशाच्या वतीनं शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यानं भारताचे प्रत्येकी ४ गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावासाठी फलंदाजीला आलेल्या बांग्लादेशानं दिवसअखेर बिन बाद ७ धावा केल्या आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com