राज्यातल्या काही देवस्थानांमध्ये कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती

Corona-virus. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News.

Masks are compulsory for employees in some temples in the state

राज्यातल्या काही देवस्थानांमध्ये कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीCorona-virus. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News.

मुंबई : शेजारच्या देशातल्या वाढत्या कोरोना परिस्थितीमुळं तीर्थक्षेत्र आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापराचं आवाहन देशातल्या नागरिकांना करण्यात आलं आहे.

त्या पार्श्वभूमीवर तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर, शिर्डीच्या साई संस्थान आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर परिसरात मास्क वापरण्याचं तसंच सुरक्षित अंतर पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पंढरपूर मंदिर व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. कोल्हापुरात आजपासून महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातल्या कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

या दोन्ही ठिकाणी भाविकांनी भाविकांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन केलं आहे. त्यांना सक्ती केलेली नाही.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *