145 runs challenge for India to win the second Test match against Bangladesh
बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला जिंकण्यासाठी १४५ धावांचं आव्हान
भारत ४ बाद ४५ धावा, विजयापासून १०० धावा दूर
ढाका: ढाका इथं सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशनं भारतासमोर विजयासाठी १४५ धावांची आव्हान ठेवलं आहे.
ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीत भारत विजयापासून १०० धावा दूर होते. खेळ थांबला तेव्हा भारताने ४ बाद ४५धावा केल्या होत्या.
आज तिसऱ्या दिवशी, बांग्लादेशचा दुसरा डाव २३१ धावांमध्ये आटोपला.
तत्पूर्वी, बिनबाद सात धावसंख्येवरून आपला दुसरा डाव पुन्हा सुरू करताना बांगलादेशने १४४ धावांची आघाडी घेत २३१ धावा केल्या. लिटन दासने ७३ आणि झाकीर हसनने ५१ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने ३, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी २ तर जयदेव उनाडकट आणि उमेश यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.
झाकीर हसन आणि लिटन दास वगळता बांग्लादेशाच्या एकाही खेळाडूला ५० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाही.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com