Tunisha Sharma’s co-star Shizaan Khan arrested in suicide case
तुनिषा शर्मा आत्महत्ये प्रकरणी तिचा सहकलाकार शिझान खानला अटक
मुंबई : तुनिषा शर्मा या अभिनेत्रीच्या आत्महत्ये प्रकरणी काल महाराष्ट्र राज्य पोलिसांनी तिचा सहकलाकार शिझान खान याला अटक केली आहे. त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.
भादवी 306 प्रमाणे वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तुनिषा शर्मा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेआण्यात आला आहे.
‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’ या टीव्ही शोमध्ये एकत्र काम करत असताना तुनिषा आणि शीजान एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, रिपोर्ट्सनुसार, शीजानचे काही काळापूर्वी तुनिशासोबत ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमध्ये राहू लागली. 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या करण्यापूर्वी ती शीजनच्या मेकअप रूममध्येही गेली होती. यानंतर तिने आत्महत्ये केली.
तुनिषा शर्मासोबत काम करणाऱ्या शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचललं आहे. दरम्यान शिझान खानला चौकशीसाठी कालच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याबाबतची माहिती सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली होती. मात्र, त्यांनतर शिझान खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरुन शिझान विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तुनिषा शर्मानं ती भूमिका करत असलेल्या मालिकेच्या वसई इथल्या चित्रीकरण स्थळीच आत्महत्या केल्याचं काल आढळलं. आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि हत्या अशा दोन्ही आरोपांखाली शिझान खान याची चौकशी करण्यात येणार आहे.
तुनिषा शर्मानं भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या मालिकेतून पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं गब्बर पुंछवाला, शेर ए पंजाब महाराजा रणजित सिंगजी आणि चक्रवर्ती अशोक सम्राट अशा मालिकांमधूनही भूमिका केल्या होत्या. तिच्या बार बार देखो, कहानी २ अशा चित्रपटांमधल्या भूमिकाही विशेष गाजल्या होत्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com