बँकांमधल्या लॉकर करारांचं नुतनीकरण १ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Reserve Bank of India logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Orders customers to complete renewal of contracts for lockers in banks by January 1, 2023

बँकांमधल्या लॉकरसाठीच्या करारांचं नुतनीकरण ग्राहकांनी १ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई : बँकांमधल्या लॉकरसाठीच्या करारांचं नुतनीकरण ग्राहकांनी १ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत.

Reserve Bank of India logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Reserve Bank of India

जर बँक ग्राहकांनी लॉकर भाड्याने घेण्याची किंवा आधीच बँक लॉकर वापरण्याची योजना आखली असेल, तर त्यांना 1 जानेवारी 2023 पूर्वी बँकांशी लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल.

आरबीआयच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, “बँकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या लॉकर करारामध्ये कोणत्याही अयोग्य अटी किंवा शर्ती समाविष्ट केल्या जाणार नाहीत. पुढे, बँकेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कराराच्या अटी सामान्य व्यवसायात आवश्यकतेपेक्षा जास्त कठीण नसतील. बँका 1 जानेवारी 2023 पर्यंत विद्यमान लॉकर ग्राहकांसोबत त्यांच्या लॉकर कराराचे नूतनीकरण करतील”.

ज्या ग्राहकांची बँकेमध्ये लॉकर आहेत, त्यांना नूतनीकरणावेळी पात्रतेचा पुरावा देणं बंधनकारक केलं आहे. यासंदर्भात आरबीआयनं ऑगस्ट २०२१ मध्ये सुधारित मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली होती.

त्यामध्ये बँकेतील महत्त्वाच्या ठिकाणी, प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना तत्त्वामध्ये दिल्या आहेत. बँकांतील कॅमेऱ्यांमधील सर्व माहिती १८० दिवस ठेवणं बंधनकारक केलं आहे.

बँकांनी ग्राहकांच्या माहितीसाठी त्यांच्या शाखानिहाय रिक्त लॉकर्सची यादी तसंच कोअर बँकिंग प्रणालीतील प्रतीक्षा यादी ठेवणं अनिवार्य केल्याचंही या मार्गदर्शन तत्त्वांमध्ये नमूद केलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “बँकांमधल्या लॉकर करारांचं नुतनीकरण १ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *