उत्तर अमेरिका आणि कॅनडाला हिमवादळाचा तडाखा

Blizzards hit North America and Canada उत्तर अमेरिका आणि कॅनडाला हिमवादळाचा तडाखा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Blizzards hit North America and Canada, 19 people died due to a snowstorm in America

उत्तर अमेरिका आणि कॅनडाला हिमवादळाचा तडाखा

अमेरिकेत हिमवादळामुळं १९ नागरिकांचा मृत्यू

उत्तर अमेरिका/ कॅनडा : उत्तर अमेरिकेतल्या लक्षावधी लोकांना मात्र नाताळचा सण अंधारातच साजरा करावा लागला. अमेरिका आणि कॅनडाच्या मोठ्या भूप्रदेशांना हिमवादळाचा तडाखा बसला असून त्यामुळे प्रचंड बर्फवृष्टि, गोठवणारा पाऊस, पूर यांचा सामना करावा लागत आहे. या आपत्तींमध्ये आतापर्यंत किमान तीस जणांचा बळी गेला असून वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.Blizzards hit North America and Canada
उत्तर अमेरिका आणि कॅनडाला हिमवादळाचा तडाखा
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

सुमारे 200 दशलक्ष अमेरिकन लोकांना हिवाळी वादळाची बर्फाच्छादित पकड जाणवत आहे. ब्रिटीश कोलंबियापासून न्यूफाउंडलँडपर्यंत देशातील बहुतांश भाग अत्यंत थंड आणि हिवाळ्यातील वादळाच्या इशाऱ्याखाली होता. एल्क पार्क, मोंटाना येथे तापमान -50F (-45C) पर्यंत घसरले आहे, तर मिशिगनमधील हेल शहर गोठले आहे.

कॅनडाजवळील ग्रेट लेक्सपासून ते मेक्सिकोच्या सीमेवर रियो ग्रान्द इथपर्यंत हिमवादळ पसरलेलं आहे. गोठवून टाकणाऱ्या थंडीचे इशारे देण्यात आले आहे. काही प्रमुख शहरांमध्ये नाताळच्या काळातील गेल्या अनेक दशकांमधील सर्वाधिक थंडीची नोंद झाली आहे.

अमेरिकेच्या मोंटाना राज्यात उणे पंचेचाळीस अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. हजारो विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. कॅनडाचा, ब्रिटीश कोलंबियापासून ते न्यूफाऊंडलँडपर्यंतचा बहुतांश उर्वरित भाग अतिशय थंडीच्या थंडीच्या तडाख्यात सापडला असून हिमवादळाचे इशारे सर्वत्र देण्यात आले आहेत.

हिमवादळात आतापर्यंत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे अनेक शहरांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळामुळे हजारो विमानांची उड्डाणं रद्द झाली होती.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *