देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक

Prime Minister Narendra Modi प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

If the country wants to move forward on the path of progress, it is necessary to get rid of mental slavery

देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक

– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित पहिल्या वीर बाल दिवस समारंभात ते बोलत होते.Prime Minister Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांनी सादर केलेल्या ‘शबद कीर्तन’ या कार्यक्रमाला देखील पंतप्रधान उपस्थित राहिले.

गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहेबजादा जोरावर सिंह आणि साहेबजादा फतेह सिंह यांच्या बलिदानाचा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केला आहे. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या पुत्रांनी बलिदान दिलं, असं ते म्हणाले. आजचा युवकही देशकार्यासाठी याच समर्पण वृत्तीनं तयार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हजारो वर्षांचा जागतिक इतिहास भीषण क्रौर्याच्या प्रसंगांनी भरलेला आहे याकडे पंतप्रधानांनी निर्देश केला. जेव्हा जेव्हा आपल्याला हिंसक क्रौर्याला तोंड द्यावे लागले तेव्हा आपल्या शूरवीरांच्या चारित्र्याने त्यांच्यावर मात केली आहे हे इतिहासाच्या पानांतून दिसून आले आहे हे त्यांनी नमूद केले.

चमकौर आणि सिरहिंदच्या लढायांमध्ये जे घडले ते कोणीही विसरू शकत नाही असे पंतप्रधान म्हणाले. या घटना केवळ तीन शतकांपूर्वी या भूमीवर घडल्या अशी माहिती त्यांनी पुढे दिली. “एकीकडे धर्मांधतेच्या वेडाने झपाटलेली शक्तिशाली मुघल सल्तनत होती तर दुसरीकडे ज्ञानाच्या तेजाने चमकणारे आणि भारताच्या प्राचीन तत्त्वांनुसार जीवन व्यतीत करणारे गुरु होते,” पंतप्रधान सांगत होते. ते म्हणाले, “एकीकडे पराकोटीची दहशत आणि धर्मांध शक्ती होत्या तर त्याचवेळी दुसरीकडे अध्यात्मिकता आणि प्रत्येक मनुष्यामध्ये देव बघण्याची करुणामय मनोवृत्तीही भारतात होती.”

अशा सर्व परिस्थितीत, मुगलांकडे लाखो सैनिकांचे सैन्य होते तर गुरूंच्या साहिबजाद्यांकडे अमाप धैर्य होते. ते एकटे असूनही मुगलांसमोर त्यांनी मान तुकविली नाही. अशा वेळी मुगलांनी त्यांना जिवंतपणी भिंतीत चिणले. या शूर वीरांचे धैर्य अनेक शतके आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत बनून राहिले आहे.

इतिहासाची मांडणी योग्य रीतीने झाली नसल्याने न्यूनगंड निर्माण होतो, म्हणून भारताच्या इतिहासातल्या आतापर्यंत सांगितल्या न गेलेल्या गौरवगाथा सरकार प्रकाशात आणत आहे असं ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातले संत नामदेवांपासूनचे जुने नातेसंबंध यावेळी त्यांनी उलगडून दाखवले.

राज्याच्या विकासात शीख बांधवांनी बजावलेली भूमिका आणि दंगलीच्या वेळी त्यांच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी उपस्थितांना ओळख करुन दिली.या कार्यक्रमात तीनशे बाल कीर्तनकारांनी शबद कीर्तन सादर केलं. तसंच तीन हजार बाल स्वयंसेवकांच्या संचलनाला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *