Mock drill today in hospitals across the country in the wake of increasing Covid outbreak abroad
परदेशात वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातल्या रुग्णालयांमधे आज मॉक ड्रील
नवी दिल्ली : परदेशांतल्या कोविड-१९ संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशातल्या तयारीचं मूल्यांकन करण्यासाठी, आज सर्व रुग्णालयांमध्ये देशव्यापी मॉक ड्रिल घेण्यात येत आहे.
या ड्रिल दरम्यान, ऑक्सिजन प्लांट, व्हेंटिलेटर, लॉजिस्टिक आणि मनुष्यबळ यावर विशेष लक्ष केंद्रित करून, कोविडशी लढा देण्यासाठी रुग्णालयातल्या उपलब्ध साधनसामुग्रीचं मूल्यांकन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतल्याच्या काही दिवसांनंतर हा सराव करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयाला भेट देऊन या मॉक ड्रीलचा आढावा घेतला. देशात कोविडचे रुग्ण वाढल्यास कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं मांडविय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
मुंबईत देखील भारत सरकारनं दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर शासकीय,महापालिका, आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या पूर्वतयारीची पडताळणी करण्याचं काम सुरू आहे. सर्व अहवाल एकत्र केले जात असून, ते आज शासकीय पोर्टलवर अपलोड केले जाणार आहेत
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com