By 2037, India will become the third-largest economy in the world
2037 पर्यंत भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार
नवी दिल्ली : भारत 2037 पर्यंत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज ब्रिटीश सल्लागार संस्था सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने आपल्या वार्षिक वर्ल्ड इकॉनॉमिक लीग अहवालात व्यक्त केला आहे.
आगामी पाच वर्षांमध्ये, भारताचा वार्षिक सकल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर सरासरी 6 पूर्णांक 4 दशांश टक्के असेल आणि त्यानंतरच्या नऊ वर्षांत जीडीपी वाढ सरासरी साडेसहा 6 टक्के असेल, असंही या संस्थेनं म्हटलं आहे.
त्याचवेळी जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत असून, पुढच्या वर्षी जगाला तीव्र मंदीचा सामना करावा लागेल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेनं 2022 मध्ये प्रथमच 100 लाख डॉलरचा टप्पा ओलांडला असला तरी महागाई रोखण्यासाठी प्रमुख मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केल्यामुळं अर्थव्यवस्थेच्या विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळं 2023 मध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसेल, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com