प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेची व्याप्ती वाढवली

Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana

Expanded scope of Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Project

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेची व्याप्ती वाढवली

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना अंतर्गत उपलब्ध औषधांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा 50%-90% कमी

देशभरातील 766 पैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9000 हून अधिक केंद्रे सुरु करून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेची वाढवली व्याप्ती

नवी दिल्ली : सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषध निर्मिती विभागाने नोव्हेंबर 2008 मध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना (पीएमबीजेवाय) सुरू केली.

3000 केंद्रे सुरु करण्याचे उद्दिष्ट डिसेंबर 2017 मध्ये साध्य करण्यात आले. तसेच, एकूण 6000 केंद्रांचे सुधारित उPradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojanaद्दिष्टही मार्च 2020 मध्ये साध्य करण्यात आले. या प्रवासात, केंद्रांची संख्या गेल्या आर्थिक वर्षातील 8610 वरून आता 9000 पर्यंत वाढली आहे.

त्यामुळेच सरकारने देशभरातील 766 पैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9000 हून अधिक केंद्रांसह पीएमबीजेपीची पोहोच वाढवली आहे. सरकारने मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना अंतर्गत उपलब्ध औषधांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा 50%-90% कमी आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, 893.56कोटी रुपये किंमतीची औषध विक्री झाली. यामुळे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत नागरिकांची सुमारे 5300 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये, भारतीय औषधे आणि वैद्यकीय उपकरणे विभागाने 30.11.2022 पर्यंत 758.69 कोटी रुपयांची विक्री केली आहे, ज्यामुळे नागरिकांची अंदाजे 4500 कोटी रुपयांची बचत झाली आहे. एकूण विक्रीतही अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे, जी जनऔषधीची व्यापक स्वीकृती दर्शवते.

ही योजना शाश्वत आणि नियमित कमाईबरोबरच स्वयंरोजगाराचा एक उत्तम स्रोत प्रदान करत आहे.

देशभरातील या 9000 पीएमबीजेपी केंद्रांद्वारे 1/- प्रति पॅड दराने जनऔषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन्सची विक्री केली जात आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *