नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळी लोकांची गर्दी

Happy New Year 2021

Crowds of people at tourist places, and religious places welcome the New Year.

 नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळी लोकांची गर्दी

मुंबई : राज्यासह देशभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनेक नागरिक पर्यटनस्थळी पोहोचले असून इतरांकडे इमारतींमध्ये किंवा नातेवाईकांच्यासोबतीनं वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे.

नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांना मोठी पसंती दिल्याचं दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत ११ हजाराहून जास्त पोलीस तैनात केले आहेत.

Happy New Year 2021

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी केलेली गर्दी लक्षात घेऊन, मुंबईत बेस्ट उपक्रमानं विविध भागात ५० ज्यादा बस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेली खुली डबल डेकर बस ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत चालवली जाणार आहे.

राज्यातल्या देवस्थानांच्या ठिकाणी देखील सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, शिर्डीचं साई मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातलं सप्तशृंगी मंदिर तसंच शिर्डीचं साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देताना नंदुरबार शहरातल्या डॉक्टर काणे  गर्ल्स हायस्कुलच्या पाचवी ते दहावी इयत्तेच्या सातशे विद्यार्थींनीनी मानवी साखळीच्या माध्यमातून २०२३ ची प्रतिकृती साकारली. नागरीकांनी धुंदीत नव्हे तर शुध्दीत राहून नववर्ष चे स्वागत करावं, असा बहूमोल संदेश देत वाशीम इथल्या बाकलीवाल विद्यालयापासून एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी सैनिकांनी जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *