वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले.

Indian Railways. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

11 coaches of Bandra Terminus-Jodhpur Suryanagari Express derail in Rajasthan

राजस्थानमध्ये वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले.

जोधपूर: राजस्थानमध्ये आज पहाटे वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस ट्रेनचे 11 डबे रुळावरून घसरले. जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा सेक्शन दरम्यान आज पहाटे ३.२७ वाजता एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उत्तर पश्चिम रेल्वेने दिली आहे. Indian Railways. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचता यावे यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी सांगितले की, रुळावरून घसरल्यानंतर १२ गाड्या वळवण्यात आल्या असून दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ते सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते म्हणाले की सर्व आपत्कालीन मदत आणि वेळेवर वैद्यकीय सहाय्य सुनिश्चित केले गेले. रेल्वेमंत्र्यांनी गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजारांची भरपाई जाहीर केली आहे. श्री वैष्णव आज संध्याकाळी अपघातस्थळी भेट देतील.

रेल्वेने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. जोधपूरसाठी हेल्पलाइन क्रमांक ०२९१-२६५४९७९, ०२९१-२६५४९९३, ०२९१-२६२४१२५ आणि ०२९१-२४३१६४६ आहेत. पाली मारवाडसाठी, हेल्पलाइन क्रमांक ०२९३-२२५०३२४ आहे. प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही माहितीसाठी 138 आणि 1072- या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *