कोविड प्रतिबंधक कालावधीत राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात उल्लेखनीय वाढ : श्री नितीन गडकरी.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, श्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, कोविड प्रतिबंध कालावधीत राष्ट्रीय महामार्ग बांधकामात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2020-21 मध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा वेग 36.5 किमी / प्रतिदिवस होता हा राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा आतापर्यंतचा सर्वात गतिमान वेग आहे .
भारताने अवघ्या 24 तासात 2.5 किमी लांबीचा चौपदरी काँक्रीट रस्ता आणि 26 किलोमीटर लांबीचा एकपदरी डांबरी रस्ता केवळ 21तासांत तयार करून जागतिक विक्रम नोंदविला आहे असे मंत्री म्हणाले.
ते म्हणाले की, बांधकामाचा हा वेग टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, ज्यात कंत्राटदारांना सहाय्य , कराराच्या तरतुदींमध्ये शिथिलता, उप कंत्राटदारांना थेट देय आणि बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना अन्न व वैद्यकीय सुविधा याचा समावेश आहे.
या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी आयआरसीच्या सर्वोच्च माप दंडांनुसार आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वैशिष्ट्यांनुसार बांधकाम केले जात आहे अये श्री. गडकरी म्हणाले . धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे अद्ययावत करण्यासह तपासणी करण्यासाठी तसेच गुणवत्तेनुसार प्रणाली सुधारणेशी संबंधित मार्गदर्शक तत्वे जारी करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण क्षेत्र स्थापन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.