Self-financing universities should prepare courses in new subjects
स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे
– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे. जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी आणि उद्योजतेच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे सांगून या विद्यापींठानी आपली सूची तयार करावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज स्वयंम अर्थसहाय्यीत विद्यापीठांच्या अडचणी संदर्भात मुंबई विद्यापीठात बैठक घेण्यात आली.
या बैठकीस आमदार सतेज (बंटी) पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाचे कुलगुरू तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, वैद्यकीय शिक्षण आणि कृषिविषयक शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करण्यातबाबत संबधित विभागाचे मंत्री यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. विद्यापीठाच्या जागेबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. या विद्यापीठांसाठी गठित केलेल्या समितीने पुढील अधिवेशनापूर्वी अहवाल सादर करावा.तसेच विद्यापीठांच्या कुलगुरू यांची निवड विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे करावी. अशा सूचनाही यावेळी दिल्या.
या बैठकीत स्वयंअर्थसहाय्यित विद्यपीठाबाबतचा कायदा व विद्यापीठाच्या अडचणी, विद्यापीठावरील नियंत्रण, नॅक मूल्यांकन कालावधी, शुल्क रचना या संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या अडचणीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com