The spontaneous response of the people of Pune to the cycle tour organized in the background of the G-20 conference
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : पुण्यात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ केला.
सायकल फेरीच्या माध्यमातून ‘जी-२०’ बाबत तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. महापालिका मुख्य भवनापासून सुरू झालेली सायकल फेरी जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने पूर्ण करण्यात आली.
यामध्ये तीनही अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी व इतर महानगर पालिकेतील अधिकारी यांनी रॅली पूर्ण केली
या रॅलीमध्ये टी ट्वेंटी व इतर पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली या रॅलीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. जवळ जवळ 1500 सायकल प्रेमी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखदेखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.
या सायकल फेरीचे नियोजन पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी आणि महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) संतोष वारुळे यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com