संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील

Defense Minister Rajnath Singh संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

India is striving to enhance its production capacity of defense materials in the fields of drones, cyber technology and artificial intelligence

ड्रोन, सायबर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील

नवी दिल्ली : ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भरलेल्या देशोदेशीच्या राजदूतांच्या परिषदेत आज ते बोलत होते.

Defense Minister Rajnath Singh संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

संरक्षण सामुग्री उत्पादनासाठी प्रोत्साहन देणारं वातावरण निर्माण करण्यात आलं असून त्यामुळे ही सामुग्री निर्यात करणाऱ्या आघाडीच्या देशांमधे आता भारताचा समावेश होतो असं त्यांनी सांगितलं.

गेल्या 5 वर्षात या वस्तूंच्या निर्यातीत 8 पट वाढ झाली असून 75 पेक्षा जास्त देशांना निर्यात केली जाते. मेक इन इंडीया अभियान देशांतर्गत उद्योजकतेला वाव देण्यासाठी असून त्याचा अर्थ जगापासून अलिप्तता असा मुळीच नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

मेक इन इंडियाचे महत्त्व अधोरेखित करताना श्री सिंग म्हणाले, या उपक्रमामध्ये मेक-फॉर-द-वर्ल्डचा समावेश आहे. ‘मेक इन इंडिया’साठी भारताचे राष्ट्रीय प्रयत्न वेगळेपणाचे नाहीत किंवा ते केवळ भारतासाठीच नाहीत यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, स्वावलंबी उपक्रम ही इतर देशांबरोबरच्या भागीदारीलाही या धोरणामुळे नवीन आयाम मिळाला आहे असं सिंग म्हणाले.

ते म्हणाले की भागीदारी आणि संयुक्त प्रयत्न हे प्रमुख घटक आहेत जे देशाच्या संरक्षण उद्योगातील भागीदारी इतर राष्ट्रांसोबत वेगळे करतात. ते पुढे म्हणाले की भारत जागतिक व्यवस्थेच्या श्रेणीबद्ध संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही, जिथे काही देश इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात.

येत्या फेब्रुवारीमधे बेंगळुरुत होऊ घातलेल्या एअरो इंडिया प्रदर्शनाचा उल्लेख करुन त्यांनी सांगितलं, की नवीन कल्पना आणि प्रकल्पांना संधी देणारा हा कार्यक्रम असणार आहे. जी 20 देशांमधे परस्पर सहमतीचं वातावरण तयार करणं हे भारताचं उद्दिष्ट असून अधिक सुरक्षित, समृद्ध आणि शाश्वत जग निर्माण करण्यावर अध्यक्ष पदाच्या कालावधीत भारताचा भर राहील असं त्यांनी सांगितलं

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *