टीव्हीचे सर्व फ्री-टू-एअर चॅनल, सेट टॉप बॉक्स शिवाय बघता येणार 

TV sets to soon have inbuilt tuners to ensure viewers get all Free-To-Air DD channels without need for a set-top box टीव्ही, अर्थात दूरचित्रवाणी संचांमध्ये लवकरच इनबिल्ट ट्यूनरची सुविधा उपलब्ध केली जाणार हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

TV sets to soon have inbuilt tuners to ensure viewers get all Free-To-Air DD channels without need for a set-top box

टीव्हीचे सर्व फ्री-टू-एअर, अर्थात मोफत चॅनल, सेट टॉप बॉक्स शिवाय बघता येणार

टीव्ही, अर्थात दूरचित्रवाणी संचांमध्ये लवकरच इनबिल्ट ट्यूनरची सुविधा उपलब्ध केली जाणार

नवी दिल्ली : टीव्ही, अर्थात दूरचित्रवाणी संचांमध्ये लवकरच इनबिल्ट ट्यूनरची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याच्या मदतीने टीव्हीचे सर्व फ्री-टू-एअर, अर्थात मोफत चॅनल, सेट टॉप बॉक्स शिवाय बघता येतील. भारतीय मानक ब्युरोनं (Bureau of Indian Standards) प्रकाशित केलेल्या नियमावलीनुसार टीव्ही संचामध्ये इनबिल्ट ट्युनर उपलब्ध केले जातील, त्यामुळे दूरदर्शन ऍनालॉग प्रसारण टप्प्याटप्प्यानं खंडित करत आहे. सध्या दूरदर्शनच्या प्रेक्षकांना फ्री-टू-एअर चॅनल बघण्यासाठी देखील सेट टॉप बॉक्स विकत घ्यावा लागतो.TV sets to soon have inbuilt tuners to ensure viewers get all Free-To-Air DD channels without need for a set-top box
टीव्ही, अर्थात दूरचित्रवाणी संचांमध्ये लवकरच इनबिल्ट ट्यूनरची सुविधा उपलब्ध केली जाणार
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

भारतीय मानकांनुसार उत्पादित केलेले टीव्ही संच योग्य ठिकाणी बसवलेल्या डिश अँटेनाच्या मदतीनं दूरदर्शन आणि आकाशवाणीचे फ्री-टू-एअर कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी सक्षम असतील. या उपक्रमामुळे सरकारी कार्यक्रम, योजना, शैक्षणिक साहित्य आणि अन्य कार्यक्रमांची माहिती देशाच्या जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत प्रसारित करायला मदत होईल.

देशात विकल्या जाणार्‍या स्मार्टफोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी सामान्य चार्जिंग सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी BIS ने USB टाइप C रिसेप्टॅकल्स, प्लग आणि केबल्ससाठी भारतीय मानक देखील प्रकाशित केले. ई-कचऱ्यावर मर्यादा घालण्याचाही यामागचा उद्देश आहे.

तिसर्‍या मानकात, BIS ने सिक्युरिटी ऍप्लिकेशन्समध्ये वापरण्यासाठी व्हिडीओ सर्व्हिलन्स सिस्टम्ससाठी भारतीय मानक प्रकाशित केले. हे ग्राहक, इंस्टॉलर आणि वापरकर्त्यांना त्यांच्या आवश्यकता स्थापित करण्यात आणि त्यांच्या इच्छित अनुप्रयोगासाठी आवश्यक उपकरणे निश्चित करण्यात मदत करेल. यामुळे पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक सुरक्षित, मजबूत आणि किफायतशीर होईल अशी अपेक्षा आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *