वर्षभरातल्या G20 परिषदेच्या बैठकींच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकींचं आयोजन

The G-20 conference जी-२०' परिषद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Organization of review meetings in Pune, Gujarat and Chennai in the background of G20 summit meetings during the year

वर्षभरातल्या G20 परिषदेच्या बैठकींच्या पार्श्वभूमीवर पुणे, गुजरात आणि चेन्नई इथं आढावा बैठकींचं आयोजन

नवी दिल्ली : भारताने G20 परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर देशांच्या विविध राज्यांमध्ये G20 बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.वर्षभरातील या बैठकींच्या पार्श्वभूमीवर पुणे, गुजरात आणि चेन्नई इथं आढावा बैठकी घेण्यात आल्या.G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

पुण्यात होणाऱ्या G20 परिषद बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे संपर्क मंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल शहरातील तयारीचा आढावा घेतला.

पुढच्या आठवड्यात होणाऱ्या या बैठकीसाठी विविध 38 देशांचे 200 प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत.लोहगाव विमानतळापासून ते सेनापती बापट मार्गावरील बैठकीच्या ठिकाणापर्यंतच्या मार्गाची काल पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.पुण्याबरोबरच महाराष्ट्र आणि देशाच्या समृद्ध वैभवशाली परंपरेचे दर्शन या निमित्ताने उपस्थित प्रतिनिधींना घडवण्यात येणार असल्याचं पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं.

गुजरातमध्ये होणाऱ्या G20 परिषदेच्या तयारीबाबत अहमदाबादमध्ये काल केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला राज्याचे पर्यटन मंत्री मुलुभाई बेरा आणि गुजरात पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. G20 प्रतिनिधींच्या भेटीच्या पार्श्वभुमीवर, इथल्या धोलाविरा आणि धोरडो सह विविध पर्यटन स्थळी केलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला आणि आवश्यक सूचनाही केल्या.

चेन्नईतही G20 देशांच्या शिक्षण समूहाची बैठक 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे, त्या पार्श्वभुमीवर काल एका बैठकीत याविषयीचा आढावा घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, राज्य सरकार आणि मद्रास आयआयटीचा गट या बैठकीत सामील झाला.तसेच G20 परिषदेच्या कार्यक्रमांसंबंधी माहिती आणि प्रसारण अधिकाऱ्यांसमवेतही चेन्नईत एक आढावा बैठक घेण्यात आली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *