ऑस्करसाठी पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश

8 films from India included in the list of films eligible for Oscars ऑस्करसाठी पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

8 films from India have been included in the list of eligible films announced by the Academy of Motion Picture for Oscars

ऑस्करसाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं जाहीर केलेल्या पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश

नवी दिल्ली : सिनेसृष्टीसाठी ऑस्कर हा मानाचा पुरस्कार मानाचा मानला जातो. ९५ वा अकादमी पुरस्कार १२ मार्च २०२३ रोजी लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या चित्रपटांची पात्रता नामांकन यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.8 films from India included in the list of films eligible for Oscars
ऑस्करसाठी  पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या ३०१ चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली. त्यात देशातल्या गंगुबाई काठियावाडी, ऋषभ शेट्टीच्या कांतारा,  दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या  द काश्मिर फाइल्स, छेल्लो शो – LAST FILM SHOW, रॉकेट्री, जंगल क्राय, इराविन निझल आणि मी वसंतराव या चित्रपटांचा समावेश आहे.

बॉलीवूड चित्रपट ‘काश्मीर फाइल्स’ ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ऑस्करमध्ये या चित्रपटाच्या शॉर्टलिस्टबद्दल माहिती दिली. काश्मीर फाईल्स 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणावर पलायन करण्याभोवती फिरते.

देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. या यादीत ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे, याचा मला मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी दिली आहे. मराठी चित्रपट आणि संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचं आहे असे मी मानतो.

ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या चित्रपटांची अंतिम यादी थोड्याच दिवसांत म्हणजेच २५ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे व हा सोहळा १२ मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये रंगणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *