Prime Minister Narendra Modi asserted that record investments are currently coming in the country
देशात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
समर्पित फ्रेट कॉरिडॉर, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, एक्स्प्रेस वे आणि लॉजिस्टिक पार्क ही भारताची नवीन ओळख
भारत 2014 पासून ‘रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्म’ या मार्गावर
इंदूर : भारतात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर मध्ये जागतिक गुंतवणूकदारांच्या चर्चासत्राच्या उद्घघाटन प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलतांना सांगितलं. हे चर्चासत्र दोन दिवस चालणार आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारत 2014 पासून ‘रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्म’ या मार्गावर आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाने त्याला अधिक गती दिली आहे. देशातल्या विशेषरुपानं तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमुळे देश गुंतवणूकदारांचं एक आकर्षक ठिकाण झालं आहे असंही ते म्हणाले.
भारतासाठी आशावाद मजबूत लोकशाही, तरुण लोकसंख्या आणि राजकीय स्थैर्याने चालतो, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, भारताने मल्टीमॉडल पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिल्याने देशात गुंतवणुकीच्या नवीन शक्यता उघडल्या जात आहेत. समर्पित फ्रेट कॉरिडॉर, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, एक्स्प्रेस वे आणि लॉजिस्टिक पार्क ही भारताची नवीन ओळख बनत असल्याचे ते म्हणाले. विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वजण मिळून काम करत असल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्थेचा मागोवा घेणाऱ्या संस्था आणि विश्वासार्ह आवाज यांचा भारतावर अभूतपूर्व विश्वास आहे.
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या या जागतिक गुंतवणूक परिषदेमुळे राज्यातल्या विविध गुंतवणूक संधी पाहायला मिळतील असंही ते म्हणाले. या परिषदेत ६५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही उद्घाटन सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com