Ten people were killed and 34 injured in a road accident on the Sinnar-Shirdi highway in the Nashik district
नाशिक जिल्ह्यात सिन्नर-शिर्डी महामार्गावर रस्ता अपघातात दहा जण ठार तर ३४ जण जखमी
पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून (PMNRF) मदत जाहीर
अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सिन्नर-शिर्डी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दहा जण ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत. खासगी आराम बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला – सहा महिला, दोन पुरुष आणि दोन मुले. सकाळी 6.00 च्या सुमारास हा अपघात झाला. 10 जणांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या अपघातात ३४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ हा भीषण अपघात झाला. रात्री 11.30 च्या सुमारास अंबरनाथ, उल्हासनगर परिसरातून गाईड कंपनीची खासगी बस सुमारे 50 प्रवासी घेऊन शिर्डीकडे निघाली होती. वावी गावानंतर शिर्डी महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात झाला.
या धडकीत खाजगी बस रस्त्यावर उलटली.
अपघातग्रस्त बस ही अंबररनाथ, उल्हासनगर भागातून ५० प्रवाशांना घेऊन शिर्डी कडे निघाली होती. वावी गाव ओलांडल्यावर हा अपघात झाला. बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली.
घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सात ते आठ रुग्णवाहिका धावून आल्या होत्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह वावी पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
नाशिक-शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून (PMNRF) मदत जाहीर
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून मदत देखील जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याबद्दल दु:ख झाले. शोकाकूल कुटुंबीयांप्रति संवेदना. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात. मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून(PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल तर जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल : पंतप्रधान मोदी”
नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी, नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com