तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेवर ३१७ धावांनी विक्रमी विजय

Cricket Updates हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

India’s record 317-run victory over Sri Lanka in the third and final match

तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेवर ३१७ धावांनी विक्रमी विजय

तिरुअनंतपुरम : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत, आज तिरुअनंतपुरम इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला ३१७ धावांनी पराभूत करत भारतानं विक्रमी विजय नोंदवला.Cricket Updates हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

भारताने ५० षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ३१७ धावांनी पराभव करून इतिहास रचला. यापूर्वी, न्यूझीलंडने जुलै २००८ मध्ये एबरडीन येथे आयर्लंडवर २९० धावांनी विजय नोंदवला होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी ३९१ धावांच आव्हान ठेवलं होतं. विराट कोहलीच्या १६६ आणि शुभमन गिलच्या ११६ धावांच्या खेळींमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.

कर्णधार रोहीत शर्मानं ४२, तर श्रेयस अय्यरनं ३८ धावांचं योगदान दिलं. निर्धारीत ५० षटकात भारतानं ५ गड्यांच्या मोबदल्यात ३९० धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमारा आणि कसून राजिताने प्रत्येकी दोन तर चमिका करुणारत्नेने एक विकेट घेतली.

३९० या मोठ्या धावसंख्येपुढं श्रीलंकेचा संघ टिकू शकला नाही. अवघ्या २२ षटकात ७३ धावांवर त्यांचा डाव आटोपला.

भारतातर्फे मोहम्मद सिराजनं ४, तर महमद शामी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. आता हा सामना जिंकून भारतानं निर्विवाद मालिका विजय मिळवला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *