देशव्यापी कोविडप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला २ वर्ष पूर्ण

2 years of Nationwide Covid Immunization Campaigns completed देशव्यापी कोविडप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला २ वर्ष पूर्ण हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

2 years of Nationwide Covid Immunization Campaigns completed

देशव्यापी कोविडप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला २ वर्ष पूर्ण

देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली : कोविड लसीकरणाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ही अनोखी लसीकरण मोहीम प्रधानमंत्रांच्या नेतृत्वाखाली चालवली जात असून, त्यांच्या सबका प्रयास या मंत्रामुळे भारतातील कोविड लसीकरण मोहीम इतिहासात नेहमीच स्मरणात राहील असं मांडवीय यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.2 years of Nationwide Covid Immunization Campaigns completed देशव्यापी कोविडप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला २ वर्ष पूर्ण हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

यावेळी त्यांनी डॉक्टर, तज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचंही लसीकरण मोहिम यशस्वी केल्याबद्दल कौतुक केलं.

भारतात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दोनशे वीस कोटी लसी देण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्रांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताची लसीकरण मोहीम संपूर्ण जगासाठी एक आदर्श म्हणून उदयास आली आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, ही भारताची अनुकरणीय लवचिकता, धैर्य आणि लोकांच्या सहभागाची भावना दर्शवणारी एक भव्य यशोगाथा आहे. भारताने 16 जानेवारी 2021 रोजी आपली लसीकरण मोहीम सुरू केली होती. या महामारीच्या धोक्यापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी, देशात आतापर्यंत 220 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १६ लाखाच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी ३० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

राज्यात आज सकाळपासून ९७३ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९५ लाख २६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *