Third Phase of Arogya University Winter Session Examination from January 18
आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेचा तिसरा टप्पा 18 जानेवारी पासून
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – 2022 परीक्षेचा तिसरा टप्पा दि. 18 जानेवारी 2023 पासून प्रारंभ होत आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, हिवाळी सत्र – 2022 मधील परीक्षेचा तिसÚया राज्यातील एकूण 104 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे 35,000 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे यांनी याबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की, विद्यापीठाकडून नियोजित वेळापत्रकानुसार हिवाळी सत्रातील तिसÚया टप्प्यातील परीक्षा 03 फेब्रुवारी 2023 पर्यंत घेण्यात येणार आहेत.
यामध्य पदवी अभ्यासक्रमाचे MBBS (2019 CBME) First, Second, Third (I), Third and Final Year MBBS (Old), BDS, BHMS (New & 2015), BPTh (Year 2012), BOTh (Year 2015), B.P.O.(Year 2017) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे M.Sc. Nursing, MPTH, MPT या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सागितले.
परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com