The role of Mahvikas Aghadi in contesting the by-elections in Kasba and Chinchwad assembly constituencies in Pune
पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक लढवण्याची महविकास आघाडीची भूमिका
-विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार
पुणे: पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक लढवण्याची भूमिका महविकास आघाडीनं घेतली असल्याचं विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
वसंतदादा साखर संस्थेत वार्षिक सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पोटनिवडणुकांसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे पण सध्या तरी या दोन्ही मतदार संघात निवडणूक लढवण्याची महाविकास आघाडीची भूमिका असून अंतिम निर्णय पुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल असं ते म्हणाले. सध्या तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणारेय. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जांगावर पोटनिवडणूक होणार आहे.
भाजपा लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप पैकी एकाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे, तर मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना भाजपने तिकीट दिलं नाही तर काँग्रेस रोहित टिळक यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.
नव्यानं ऊसतोडणी यंत्र अर्थात harvester घेणाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असला तरी यापूर्वी ज्यांनी हे यंत्र घेतलं आहे त्यांनाही मदत देण्याबद्दल आम्ही मागणी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची तयारी दर्शवली असल्याचं अजित पवार म्हणाले.
प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी होता, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यात अंजनी इथं पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com