Footwear industry should focus on quality and reduce import dependency to gain a larger share in the international market
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा वाटा मिळविण्यासाठी फुटवेअर उद्योगाने गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून आयात अवलंबित्व कमी करावे
-वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी फुटवेअर उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा वाटा मिळविण्यासाठी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्यास आणि आयात अवलंबित्व कमी करण्यास सांगितले.
ते आज नवी दिल्ली येथे भारतात क्रीडा शूज निर्मितीमध्ये गुंतलेल्या शंभरहून अधिक उद्योगपतींच्या मेळाव्याला संबोधित करत होते. श्री गोयल यांनी भर दिला की चामड्याच्या आणि नॉन-लेदर फुटवेअरसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश या वर्षी 1 जुलैपासून लागू केले जातील.
त्यांनी पुनरुच्चार केला की चांगल्या गुणवत्तेसाठी आणि मोठ्या उत्पादनासाठी भारतीय मानक ब्युरोचे पालन करणे आवश्यक आहे ज्यामुळे शेवटी ग्राहकांना चांगल्या दर्जाची उत्पादने मिळतील.
कमी दर्जाचा आणि कमी किमतीच्या कच्च्या मालाच्या आयातीबद्दल मंत्री महोदयांनी चिंता व्यक्त केली आणि या प्रवृत्तीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. श्री गोयल यांनी यंत्रसामग्रीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे आणि देशांतर्गत यंत्रसामग्री उत्पादकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com