President Draupadi Murmu will distribute the Prime Minister’s National Child Awards
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण होणार
राष्ट्रपती मुर्मू उद्या नवी दिल्लीत 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण होणार आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा होईल. यावेळी राष्ट्रपती अनन्यसाधारण कामगिरी केलेल्या ११ मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करतील.
कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, शिक्षण, समाजसेवा आणि क्रीडा अशा सहा क्षेत्रांमध्यो उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ५ ते १८ या वयोगटातील मुलांची निवड केली जाते.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याला पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिलं जातं.यानंतर २४ जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधणार आहेत.
महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या देखील स्वतंत्रपणे या पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधतील. राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई हे देखील यावेळी उपस्थितीत असणार आहेत.
कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शैक्षणिक, सामाजिक सेवा आणि क्रीडा या श्रेणी आहेत. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com