The education department starts a study regarding the old retirement scheme for teachers
शिक्षकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेबाबत शिक्षण विभागाक़डून अभ्यास सुरू
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : शिक्षकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेबाबत शिक्षण विभागाक़डून अभ्यास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्ष-बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी सभा झाली, त्यावेळी शिंदे बोलत होते.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवा निवृत्ती योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दावोस इथल्या परिषदेतल्या गुंतवणुकीसंदर्भात आरोप केले जात आहेत.
मात्र, अनेक परदेशी कंपन्या थेट गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रित उपक्रमातून गुंतवणुकीला प्राधान्य देतात, असं ते म्हणाले. दावोसमध्ये अनेक उद्योगपती देशातले असले, तरी गुंतवणूक ही परदेशीच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
यापूर्वीच्या सरकारनं केलेल्या सामंजस्य कराराचं काय झालं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कितीही आरोप केले तरी कामानं उत्तर देणारं हे युतीचं सरकार असून आरोपांचा आपण नक्कीच हिशोब देऊ, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com