शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र 

Prakash Ambedakr- Uddhav Thakre हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Shiv Sena-Vinchit Bahujan Aghadi alliance

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली युतीची घोषणाPrakash Ambedakr- Uddhav Thakre हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईतील आंबेडकर भवनात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (23 जानेवारी) मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त आज या युतीची घोषणा करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युती होत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यासाठी फारसा उत्सुक नसल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना वंचितशी युती करण्याविषयी अप्रत्यक्षपणे नापसंती दर्शविली होती. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत मला माहिती नाही. मी या भानगडीतच पडत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या कार्यक्रमावेळी शरद पवार यांना युतीत सामील होण्यासाठी साद घातली.

देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आपण एकत्र येत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. सध्या ही युती फक्त शिवसेनेसोबतच असून महाविकास आघाडीचे अन्य घटकपक्षही सोबत येतील, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *