The cabinet will be expanded in the state soon
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती
मुंबई : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक प्रकल्प जे राज्याच्या हिताचे आहेत ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्याचं काम आम्ही थांबू दिलं नाही, असा दावाही शिंदेंनी केलाय.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत विस्ताराचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही लवकरच विस्तार होणार असल्याचं बैठकीनंतर सांगितले. विशेष म्हणजे आधी शाह-शिंदे आणि फडणवीसांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर शाहांनी फडणवीसांसोबत स्वतंत्र बैठक घेतली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com