Youth should work to transform freedom into sovereignty.
स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी युवकांनी कार्य करावे
– दिलीप आबा तुपे
साधना विद्यालयात देशाचा 74 व्या प्रजासत्ताक दिन साजरा
हडपसर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्तांनी रक्त सांडले.आपल्या प्राणांचे बलिदान दिले.त्यामुळे आज भारत देशात स्वातंत्र्याची भव्य इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानानुसार राज्यकारभार सुरू झाला. खऱ्या अर्थाने प्रजा सत्ताक म्हणजे स्वतंत्र झाली. देशाला स्वातंत्र्य आणि राज्यघटना मिळाली, देश सुराज्याकडे वाटचाल करत आहे. देशाचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी युवकांनी कार्य करावे ,अभ्यासाबरोबर विविध क्षेत्रात यश मिळवावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे यांनी केले.साधना विद्यालयात आयोजित देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण करण्यात आले. एन.सी.सी.,आर. एस.पी.व स्काऊट , ट्रुपच्या वतीने ध्वजास मानवंदना देऊन संचलन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे आजीव सभासद व साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य अरविंद तुपे, आयर्नमॅन दशरथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते मंगेश तुपे,एस.एम.जोशी कॉलेजचे प्राचार्य डाॅ.नानासाहेब गायकवाड, उपप्राचार्य जगताप सर, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुशीर, साधना गर्ल्स इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका झीनत सय्यद,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते , कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,आजीव सेवक अनिल मेमाणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर वुशू या कराटे प्रकारातील स्पर्धेसाठी निवड झालेल्या कमलेश विजय सकट या खेळाडूचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.तर ध्वजसंचलन एन. सी. सी. ऑफिसर ,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद लालासाहेब खलाटे व R.S.P जिल्हा समादेशक रमेश महाडीक यांनी केले.कार्यक्रमाचे निवेदन अनिल वाव्हळ व प्रतापराव गायकवाड यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com