The 30th January Exams of the university will be held on 5th February
विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांचे पेपर ३० जानेवारी ऐवजी रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्याचे फेरनियोजन
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांची हिवाळी सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक मतदान ३० जानेवारी २०२३ रोजी होणार असल्याने तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील काही महाविद्यालये मतदान केंद्र म्हणून जाहीर केल्यामुळे या एका दिवसाचे सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांचे पेपर ३० जानेवारी ऐवजी रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्याचे फेरनियोजन विद्यापीठाने केले आहे.
हा निर्णय विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यासाठी लागू आहे. या निवडणुकीसाठी इतर विद्यापीठांनी देखील ३० जानेवारी चे पेपर पुढील काळात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत विस्तृत माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर (http://www.unipune.ac.in/) प्रसिद्ध केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com