ONGC’s iconic oil exploration vessel ‘Sagar Samrat’ re-dedicated as mobile offshore production unit
ओएनजीसीच्या ‘सागर सम्राट’ ह्या सुप्रसिद्ध तेल उत्खनन जहाजाचे मोबाईल ऑफशोअर उत्पादन युनिट म्हणून पुन्हा राष्ट्रार्पण
सागर सम्राट खोल समुद्रातही कार्यरत राहू शकेल, यातून आतापर्यंत अज्ञात असलेले तेलसाठे शोधण्याची संधी निर्माण होईल: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी
या सुविधेमुळे, भारताच्या तेल उत्पादनात प्रतिदिन 6000 बीबीएलएस वाढ होण्याची अपेक्षा- हरदीप पुरी
2047 पर्यंत ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या सातत्यपूर्ण प्रवासातील हे एक सकारात्मक पाऊल
गेल्या 32 वर्षात, सागर सम्राट ने जवळपास 125 विहिरी खोदल्या
मुंबई : “सागर सम्राटचे पुनर्राष्ट्रार्पण म्हणजे आजच्या अनिश्चिततेच्या आणि निसर्गातील चढउतारांच्या काळात, पुनर्रेखन आणि अभिनव प्रयोगांच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवण्याचे धाडस आणि तीव्र इच्छाशक्ती यांचा प्रत्यक्ष पुरावाच आहे.” असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, तसेच गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते, ओएनजीसीच्या ‘सागर सम्राट’ ह्या सुप्रसिद्ध तेल उत्खनन जहाजाचे मोबाईल ऑफशोअर उत्पादन युनिट म्हणून पुनर्राष्ट्रार्पण करण्यात आले.
ह्या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये, पुरी यांनी म्हटले, “आता मोबाईल ऑफशोअर उत्पादन युनिट` या नावाने सागर सम्राट सागरावर राज्य करत आहे. काल, या ओएनजीसी इथे ऊर्जा सैनिकांसोबत देशाच्या मौल्यवान संपत्तीला पुन्हा राष्ट्राला अर्पण करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. सागर सम्राट 1973 साली तयार करण्यात आले , या जहाजाद्वारे आजपर्यंत, 14 महत्वाच्या सागरी, तेल आणि वायू संशोधन केले असून, 125 तेल विहिरी खोदल्या आहेत.”
“या अत्याधुनिक सुविधेत20,000 BPD कच्चे तेल हाताळण्याची क्षमता आहे. तसेच, कमाल निर्यात गॅस क्षमता दरदिवशी 2.36 एमसीएम इतकी असेल आणि यामुळे येत्या काही दिवसांत भारताच्या तेल उत्पादनात प्रतिदिन 6000 बीबीएलएस तेलाची भर पडेल अशी अपेक्षा आहे.
“2047 पर्यंत ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या सातत्यपूर्ण प्रवासातील हे एक सकारात्मक पाऊल आहे असे म्हणता येईल. हे युनिट खोल पाण्यात काम करण्यास सक्षम असेल, तसेच आजपर्यंत न वापरलेल्या साठ्यांमधून तेल उत्खनन करण्याच्या नव्या संधी यातून खुल्या होतील, “असे, हरदीप पुरी यांनी सांगितले.
1973 मध्ये कार्यान्वित झालेल्या सागर सम्राटने जागतिक तेलाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले. गेल्या 32 वर्षात, सागर सम्राट ने जवळपास 125 विहिरी खोदल्या आहेत आणि भारतातील 14 प्रमुख ऑफशोअर तेल आणि वायू संशोधनात या युनिटचा महत्वाचा सहभाग राहिला आहे.
सुरुवातीला जॅक-अप ड्रिलिंग विहीरची सुविधा असलेले, सागर सम्राट आता मोबाईल ऑफशोअर प्रोडक्शन युनिट (MOPU) मध्ये रूपांतरित झाले आहे. ब्रिटीश अभियांत्रिकी आणि सल्लागार समूह वुड ग्रुपच्या टेक्सास स्थित मस्टँग युनिटने या जहाजाचे फ्रंट-एंड अभियांत्रिकी काम केले आहे.
एमओपीयू सागर सम्राटने उत्पादन 23 डिसेंबर 2022 रोजी सुरू केले. आज हे जहाज, सध्या मुंबईच्या पश्चिमेला 140-145 किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम समुद्रात (WO)-16 फील्डवर तैनात आहे. एमओपीयू ची रचना दररोज 20,000 बॅरल कच्च्या तेलाची हाताळणी करण्यासाठी केली गेली आहे आणि त्याची कमाल निर्यात गॅस क्षमता दररोज 2.36 दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी काल म्हणजेच, 28 जानेवारी 2023 रोजी, मुंबईत सागर सम्राट इथे झालेल्या एका कार्यक्रमात, ओएनजीसी म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या महत्वाकांक्षी सागर सम्राट या मुंबईच्या पश्चिम सागरी किनाऱ्यापासून 140-145 किमी दूर असलेल्या सागरी तेल उत्खनन प्रकल्पाचे, ‘मोबाईल ऑफशोअर उत्पादन विभाग’ (MOPU) म्हणून पुनर्राष्ट्रार्पण केले. यावेळी ओएनजीसी चे अध्यक्ष, अरुण कुमार सिंह आणि पेट्रोलियम सचिव, पंकज जैन देखील उपस्थित होते.
भारताचे उत्खनन क्षेत्र 2025 पर्यंत 0.5 दशलक्ष चौरस किमीपर्यंत वाढवण्याचा तसेच, 2030 पर्यंत 1.0 दशलक्ष चौ. किमी. पर्यंत वाढवण्याचा भारत सरकारचा मानस आहे, असेही केंद्रीय मंत्री यावेळी म्हणाले. आता ‘जाण्यास शक्य नाही’ असा भाग 99 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, ज्यामुळे खूप अतिरिक्त जागा आता मोकळी झाली आहे. त्यातून भारताच्या EEZ चे अतिरिक्त सुमारे 1 दशलक्ष चौ.कि.मी. अन्वेषणासाठी उपलब्ध झाले आहे.शेवरॉन, एक्सॉनमोबिल आणि टोटल एनर्जी सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीय ऊर्जा आणि पेट्रोलियम विभागात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत आणि काही कंपन्या परस्पर फायदेशीर भागीदारी मजबूत करण्यासाठी ओएनजीसी सोबत आधीच बोलणी करत आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com