भाषांतर आणि अध्यापनशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषद

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

A two-day National Conference on Translation and Pedagogy at the University

विद्यापीठात दोन दिवसीय भाषांतर आणि अध्यापनशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषद

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविलेली तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १ व २ फेब्रुवारी रोजी भाषांतर आणि अध्यापनशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचा इंग्रजी भाषा विभाग आणि राष्ट्रीय भाषांतर मंडळ (नॅशनल ट्रान्सलेशन मिशन) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले आहे.Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

याबाबतची माहिती देताना इंग्रजी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ.चंद्राणी चॅटर्जी यांनी सांगितले, ही परिषद विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात होणार असून याचे उद्घाटन प्र कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ इतिहासकार प्रा.राजा दीक्षित व म्हैसूरच्या राष्ट्रीय भाषांतर मंडळाचे संचालक प्रा.शैलेंद्र मोहन हेही उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत भाषांतराचा विस्तार आणि त्याचे अध्यापनशास्त्र या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेत भाषांतराचा अभ्यास कश्या प्रकारे केला जात आहे आणि तो कश्या प्रकारे केला जावा या विषयी उहापोह करण्यात येणार आहे. भारतातील भाषिक वैविध्य पाहता भारतात भाषांतर या विषयात म्हणावे तेवढे संशोधन झालेले नाही. यासाठीच भाषांतराबाबत नवीन अध्यापन पद्धती तयार करणे, केवळ प्रचलित अध्यापन पद्धती नाही तर नव्या अध्यापन पद्धतींचा या निमित्ताने शोध घेणे आदी बाबी या परिषदेत चर्चिल्या जाणार आहेत. शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने नवीन ज्ञान निर्मितीचे नवा अध्याय म्हणून या भाषांतर विषयाकडे पाहण्यात येणार आहे.

या परिषदेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविलेली तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत असेही डॉ.चॅटर्जी यांनी सांगितले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *