अधिवेशनात कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार असल्याची सरकारची ग्वाही

Hadapsar News, Hadapsar Latest News, हडपसर मराठी बातम्या

An assurance from the government that it is ready to discuss any issue in the budget session of Parliament

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार असल्याची सरकारची ग्वाही

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा

नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. संसद भवन संकुलात आयोजित या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

Hadapsar News, Hadapsar Latest News, हडपसर मराठी बातम्या
File Photo

या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, सीपीआय (एम)चे एलामाराम करीम, शिवसेनेच्या (यूबीटी) प्रियांका चतुर्वेदी, आरजेडीचे मनोज झा, आपचे संजय सिंह, बीआरएस खासदार के केशवा राव आणि बीजेडी नेते सस्मित पात्रा उपस्थित होते.

अधिवेशनाच्या कार्यकाळात सर्वपक्षीय खासदारांनी सदनाच्या कामकाजात सहकार्य द्यावं असं आवाहन प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केलं. आजची बैठक सकारात्मक वातावरणात झाली, तसंच यामध्ये २७ राजकीय पक्ष सहभागी झाल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांना दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्प येत्या बुधवारी १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ६ एप्रिलपर्यंत चालणार असून त्याच्या ६६ दिवसांच्या कालावधीत एकूण २७ बैठका होणार आहेत.

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणार असून दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण अहवाल ही मांडला जाईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *