वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती लातूर इथल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात
Vande Bharat Express to be manufactured at Latur Coach Factory – Minister Ashwini Vaishnav
लातूर इथल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार
– मंत्री अश्विनी वैष्णव
नवी दिल्ली : लातूर इथल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.
दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी कोणत्याही मोठ्या प्रकल्पातल्या रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही. मात्र आता वंदे भारतची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे.
लातूरसह चेन्नई, सोनीपत, रायबरेली इथं वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी हायड्रोजन ट्रेनची सुरुवात डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात येणार असून, यावर्षी बुलेट ट्रेनच्या कामावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी यावेळी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com