Mahavikas Aghadi’s decision to contest the assembly by-elections together
विधानसभेची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय
विधानसभेची कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय
विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार !: नाना पटोले
मुंबई : विधानसभेची कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं आज जाहीर केला. कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार हे उद्या जाहीर करु हे आज मुंबईत संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते. विद्यमान आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यातल्या इतर जागांवर विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केले होते. त्यामुळं या जागा बिनविरोध करण्याचा प्रश्न नाही, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.
कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे ६ इच्छुक उमेदवार आहेत. ही नावं हाय कमांडकडे पाठवली जातील आणि त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com