पोटनिवडणुकीसाठी कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमधे अश्विनी जगताप

सार्वत्रिक निवडणूका Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Hemant Rasne in Kasba and Ashwini Jagtap in Chinchwad for the by-election

पोटनिवडणुकीसाठी कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमधे अश्विनी जगताप

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमधे अश्विनी जगताप यांना भाजपाची उमेदवारी जाहीर

मुंबई : पुणे जिल्ह्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा मतदारसंघातून हेमंत रासने यांना, तर चिंचवड इथून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.सार्वत्रिक निवडणूका Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या मतदारसंघातल्या आमदारांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन आपण सर्व पक्षांना करणार असल्याचंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

भाजपाच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या.

विधानसभेची कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं काल जाहीर केला होता.

भाजपने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींना वेग आला असून कसबा आणि चिंचवडच्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा, हे आघाडीच्या नेत्यांकडून निश्चित करण्याची आल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कसबा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार असून चिंचवडची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे.

आघाडीत गेल्या अनेक वर्षांपासून कसब्याची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आता होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आक्रमकपणे या जागेची मागणी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून ही जागा अखेर काँग्रेसला सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे चिंचवडमधील राष्ट्रवादीचं प्राबल्य पाहता या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जाणार आहे

कसब्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर चिंचवडमधून राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांचं नाव उमेदवारीसाठी निश्चित केल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पत्रक काढून ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *