A mild earthquake hit many villages in Kalamanuri taluk in Hingoli district
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या अनेक गावांना भूकंपाचा सौम्य धक्का
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, आणि कळमनुरी तालुक्यातल्या अनेक गावांना आज सकाळी सव्वा आठच्या सुमाराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूगर्भातुन आवाज येत जमीन हादरली. २०२३ या वर्षातला हा दुसरा धक्का आहे.
वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे हे गाव वसमत, कळमनुरी आणि औंढा या तीन तालुक्यांसाठी केंद्रबिंदू मानलं जातं. सात वर्षांपासून पांगरा शिंदे या गावी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. कधी भूकंपाची नोंद होते, तर कधी नोंद होत नाही.
यावर्षी ८ जानेवारी रोजी ३ पूर्णांक ६ दशांश रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद आहे. आजचा धक्का सौम्य असल्याचं तालुका प्रशासनानं सांगितलं. तिन्ही तालुक्याना वारंवार भुकंपाचे धक्के बसत असल्यानं नागरीकात भीती निर्माण झाली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com