US announces additional defense assistance for Ukraine
युक्रेनसाठी अतिरिक्त संरक्षणाच्या मदतीची अमेरिकेची घोषणा
अमेरिकेनं युक्रेनसाठी काल अतिरिक्त संरक्षण मदत देण्याची घोषणा केली आहे. यानुसार अध्यक्षांना सुरक्षा सहाय्यता निधीतून ४२ कोटी ५० लाख अमेरिकी डॉलर्स आणि युक्रेन सुरक्षा सहाय्यता उपक्रम निधीतून १७५ कोटी अमेरिकी डॉलर्सची मदत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार, युक्रेनला आपल्या लोकांचं संरक्षण करण्यास मदत व्हावी, म्हणून महत्त्वपूर्ण हवाई संरक्षण क्षमता,सशस्त्र पायदळ वाहनं आणि भाला तसंच रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे, तोफगोळे आणि पारंपारिक आणि लांब पल्ल्याच्या रॉकेटसह इतर उपकरणांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com