Karmaveer’s dream is to make self-reliant students
रयतेतून स्वावलंबी विद्यार्थी घडावेत हे कर्मवीरांचे स्वप्न
: विजय कोलते माजी चेअरमन पश्चिम विभाग -रयत शिक्षण संस्था.
हडपसर : रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांच्या त्यागातून व समाजाच्या घामातून उभी राहिलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर स्वावलंबी व्हावे व समाजाची सेवा करावी हे कर्मवीरांना अभिप्रेत होते.
कर्मवीर अण्णांचे स्वप्न पूर्ण करणे हे सर्व रयतसेवक,विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून स्वावलंबी व्हावे व आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजसेवा व समाजाच्या विकासासाठी करावा .त्याचबरोबर रयत बॅकेने विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाबरोबर विदयार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे माजी विभागीय चेअरमन व माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विजय कोलते यांनी केले.
द रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 81 व्या वर्धापनदिनानिमित्त औंधगाव पुणे व हडपसर पुणे शाखा कार्यक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्त सभासदांना चांदीचे नाणे भेट देण्याचा समारंभ एस.एम. जोशी महाविद्यालय हडपसर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विजय कोलते बोलत होते. या कार्यक्रमात रयत सेवकांच्या 10 वी ,12 वी ,व शासकीय शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक व बहुसंख्येने रयतसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक अशोक कोलते यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व शिवाजी मोरमारे यांनी केले तर आभार ज्योत्स्ना बाळसराफ यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com