४१ वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन

Pune Municipal Corporation

41st Fruits Flowers and Vegetables Competition and Exhibition

४१ वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्ताने ४१ वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्ताने ४१ वे फळे फुले व भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन, दि. ११ व १२ फेब्रुवारी २०२३ करिता छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे ४ येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.Pune Municipal Corporation

फुले, फळे, भाज्या, झाडे किंवा रोपे यांची प्रदर्शन आयोजित करणे तसेच अशी प्रदर्शने आयोजित करण्यासाठी खाजगी व सार्वजनिक संस्थांना सहाय्य करणे आणि झाडे व वनस्पती यांचे मानवी जीवनात जे महत्वाचे स्थान आहे त्याबद्दल लोकमत तयार करणे या उद्देशाने पुणे मनपाच्यावतीने दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते.

या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण २१८ विभाग आहेत. त्यामध्ये शोभिवंत पाना फुलांच्या कुड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह, गुलाब पुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, सॅलेड सजावट बचत गटातील माहिलांसाठी, फळे, भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्प गुच्छ, शिंपले, वेण्या, गजरे, प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

विविध प्रकारचे डेलिया, आर्किड, अॅन्थूरीअम, जरबेरा गुलाब, कार्नेशन इ. प्रकराची हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उद्यानाच्या प्रतिकृती पाहण्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. सदरहू प्रदर्शन निमित्ताने विविध स्पर्धा मध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ दि. १२/०२/२०२३ रोजी सांयकळी ५.०० वाजता छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे ४ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने, पुणे विद्यापीठ, मेट्रो, नदी सुधारणा प्रकल्प, एन.डी.ए., सी.एम.ई, वन विभाग, पुणे सर्प विज्ञान संस्था, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पर्यावरण केंद्र, पुष्करणी, उत्तरा पर्यावरण केंद्र, लोणावळा, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, फ्रेडंस ऑफ बोन्साय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इ. संस्था सहभागी होणार आहेत.

या प्रदर्शना मध्ये बोन्साय, काष्ठ शिल्प, फिचर्स गार्डन, टाकाऊ पासून टिकाऊँ वस्तू, कागदी कलाकुसर, विविध पुष्परचना इ. नागरिकांना पहावयास मिळणार आहेत. तसेच माझी वसुंधरा वृक्ष लावा, वृक्ष जगवा, सायकलचा वापर जास्तीत जास्त करण्यात यावा, अशा प्रकारच्या संकल्पना साकारण्यात येणार आहेत.

निसर्ग छायाचित्रकार कु. राजवर्धन पाटील, औंध यांचे छायाचित्राद्वारे निसर्गाची जैव विविधता ‘सेल्फी पॉईट येथे लावण्यात येणार आहे. राजवर्धनचे मनपा वर्धापनदिना निमित्ताने भाजीपाला प्रदर्शनात छायाचित्र प्रदर्शनाचे यंदा सलग १२ वे वर्ष आहे. छायाचित्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

या प्रदर्शनामध्ये फुले, फळे, वृक्षांची रोपे, बागकाम साहित्य, बी-बियाणे, खते यांचे विक्रीचे स्टॉल रहाणार असून नागरिकांनी दि. ११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० वा पर्यंत विविध बाग विषयक वस्तू / साहित्य खरेदी करता येईल. सदरचे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामुल्य खुले असणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *