Under the Bharatmala project, 35 different types of logistics parks are being developed across the country – Nitin Gadkari
भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात ३५ विविध प्रकारचे लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जात आहेत – नितीन गडकरी
नवी दिल्ली : भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात ३५ विविध प्रकारचे लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जात आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
या पार्क मुळे मालाच्या आकारमानानुसार त्याला एकत्रीत करणं आणि वेगळं करणं सोपं होणार आहे. त्याच प्रमाणे हे कार्गो पार्क रस्ते वाहतूक ते रेल्वे आणि जलमार्गांपर्यंत एकमेकांना जेडली जातील. यामुळे लॉजिस्टिक क्षेत्राची कार्यक्षमता आणखी वाढेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com