A ‘Police Technology Mission’ is needed to update the police force
पोलिस दलाला अद्ययावत करण्यासाठी पोलिस तंत्रज्ञान मिशन गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
हैदराबाद: पोलिस दलाला अद्ययावत करण्यासाठी पोलिस तंत्रज्ञान मिशन गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. यामुळं कॉन्स्टेबलपासून पोलिस महासंचालकांपर्यंत सर्व जण तंत्रज्ञान स्नेही होतील आणि यामुळं पोलिस दल अधिक सक्षम होईल, असं त्यांनी सांगितलं.
भारतीय पोलिस सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडला हैदराबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत ते संबोधित करत होते. ३७ महिला अधिकारी आणि २९ परराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांसह एकूण १८७ अधिकारी यात सहभागी झाले होते.
दक्षता, तयारी आणि अंमलबजावणी हे तीन मंत्र लक्षात ठेवा. पोलिसिंग अधिकाधिक परिणामकारक करण्यासाठी सर्वसामान्यांच्या संपर्कात रहा, जबाबदारीनं वागा असा सल्ला त्यांनी नव्या अधिकाऱ्यांना दिला. सायबर गुन्हेगारी, डेटा आणि माहितीचा गैरवापर यासारखे गुन्हे वाढत असताना पोलिसिंग अधिक चौकस करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या कणखर भूमिकेमुळं जम्मू काश्मिरातले दहशतवादी हल्ले, ईशान्येकडची घुसखोरी आणि माओवाद्यांचे हल्ले कमी झाल्याचं ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com