Due to security reasons, CCTV will be installed in Mumbai Mahanagara Palika chains
सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई महानगर पालिका शांळांमध्ये बसवले जाणार सी सी टिव्ही
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या १८ विशेष शाळांसाठी सामग्री
मुंबई : सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई महानगर पालिका शांळांमध्ये सी सी टिव्ही बसवण्याच निर्णय महानगर पालिका प्रशासनानं घेतला आहे. या बाबत काल प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. या साठी प्रशासनानं प्रकल्प सल्लागाराची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. या करता एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या महापालितेच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी ३ कोटी ३४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हा प्रकल्प त्याचाच एक भाग आहे.त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या १८ विशेष शाळांसाठी सामग्री विकत घेण्याचाही निर्णय घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांचं वैद्यकीय परिक्षण करणारी उपकरणंही या शाळांमध्ये बसवली जाणार आहेत.
कौशल्या विकास विभाग सुरू करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात महापालिकेनं शिक्षण विभागा बरोबर एक सामंसस्य करारही केला होता. याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देशही दिले आहेत.
तसंच इलेक्ट्रॉनिक्स , कृत्रीम बुद्धिमत्ता, फॅशन डिजाईनिंग, रोबोटिक, ऑटोमोबाईल आदी क्षेत्रात जवळपास ४१ हजार ७७४ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाणार असल्याचंही महापालिकेनं सांगितलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com