The government aims to take the export of defence materials to 500 crore US dollars – Prime Minister
संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
एरो इंडियाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे केले प्रकाशन
“बेंगलुरूचे आकाश नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष देत असून; ही नवी उंची म्हणजे नव्या भारताची सत्यता आहे”
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरूमधील येलाहांका येथील हवाई दलाच्या तळावर एरो इंडिया 2023 या कार्यक्रमाच्या 14 च्या भागाचे उद्घाटन केले. “अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” ही या वर्षीच्या एरो इंडिया 2023 कार्यक्रमाची संकल्पना असून या कार्यक्रमात 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह जगभरातील 80 हून अधिक देशांचा सहभाग असणार आहे.
‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमात स्वदेशी बनावटीची सामग्री आणि स्वदेशी तंत्रज्ञान यांचे सादरीकरण तसेच परदेशी कंपन्यांशी भागीदारीचा प्रयत्न यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
भारताची संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात २०२४-२५ पर्यंत ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी बंगळुरू इथं एरो इंडिया २०२३ च उदघाटन करताना बोलत होते.
भारत लवकरच संरक्षणविषयक सामुग्रीच्या उत्पादनाचं नव केंद्र बनेल असं ते म्हणाले. ‘कोट्यवधी संधीकडे नेणारी धावपट्टी’ हे ‘एरो इंडिया’ कार्यक्रमाचं बोधवाक्य असून त्यातून भारताची या क्षेत्रातली उत्तुंग भरारी दिसून येते असं ते म्हणाले.
कर्नाटकच्या तरुणांच्या तंत्रज्ञान कौशल्याची त्यांनी प्रशंसा केली आणि देशाच्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये हातभार लावण्याचं आवाहन केलं. यावेळी उपस्थीतांसाठी हवाई कसरतीच आयोजन करण्यात आलं होत.
21व्या शतकातील नवीन भारत कोणतीही संधी गमावणार नाही किंवा यासाठी कोणतेही प्रयत्न कमी पडू दिले जाणार नाहीत”, असे सांगत पंतप्रधानांनी सुधारणांच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात आणलेल्या क्रांतीची नोंद घेतली. अनेक दशके सर्वात मोठा संरक्षण आयातदार देश, आता जगातील 75 देशांमध्ये संरक्षण उपकरणे निर्यात करू लागला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
गेल्या 8-9 वर्षांतील संरक्षण क्षेत्रातील परिवर्तनाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, वर्ष 2024-25 पर्यंत संरक्षण निर्यात 1.5 अब्जांवरून 5 अब्जांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. “येथून पुढे भारत आता सर्वात मोठ्या संरक्षण उत्पादक देशांमध्ये सामील होण्यासाठी वेगाने पावले उचलणार आहे आणि याकामी आपले खाजगी क्षेत्र आणि गुंतवणूकदार मोठी भूमिका बजावतील,” पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी खाजगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले ज्यामुळे त्यांच्यासाठी भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये नवीन संधी निर्माण होतील.
एरो इंडिया २०२३ कार्यक्रमानिमित्त एक विशेष टपाल तिकीटही यावेळी प्रधानमंत्र्यांनी जारी केलं. प्रधानमंत्र्यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेत असून एरो इंडिया कार्यक्रमामुळे संरक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यावेळी म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com