Lecture by Dr. Shantanu Ozarkar on Stages of Human Evolution
मानव उत्क्रांतीचे टप्पे या विषयावर डॉ.शंतनू ओझरकर यांचे व्याख्यान
पुणे : मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यावर माणसामध्ये कसे बदल घडत गेले, या बदलामागे कोणती जीवशास्त्रीय आणि सांस्कृतिक कारणे आहेत आणि वर्णभेदाचा मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यावर कसा परिणाम होतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे डॉ. शंतनू ओझरकर यांच्या व्याख्यानाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाकडून मानवशास्त्र विभागातील प्राध्यापक व मानवशास्त्रज्ञ डॉ. शंतनू ओझरकर यांच्या ‘ मानवी उत्क्रांती- ७० लाख वर्षांची कहाणी ‘ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतिहास विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच विविध विभागातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. ओझरकर म्हणाले, मानवशास्त्रीय अभ्यासानुसार ७० लाख वर्षापासूनच्या मानवी उत्क्रांतीत आधुनिक मानवाचे अस्तित्व हे ३ लाख वर्षांपूर्वीचे आहे. त्यातूनही केवळ ७० हजार वर्षापूर्वी त्याचे अस्तित्व हे आफ्रिका खंडाच्या बाहेर सापडते.
जगातील सर्व माणसांचा डीएनए हा ९९.९ टक्के सारखाच आहे. त्यामुळेच जगभरात जो जातीय, वांशिक, वर्णभेद चालतो त्याला जीवशास्त्रीय दृष्ट्या कोणताही आधार नाही असे म्हणता येईल.
ज्याप्रमाणे एका फांदीला दोन फांद्या फुटतात त्याप्रमाणे माणूस आणि माकडाचे नाते आहे असे म्हणता येईल. माकड हे मानवाचे पूर्व रूप नाही तर मानवाचे आणि माकडाचे पूर्वज एक आहेत, असे मानवशास्त्रीय अभ्यास सांगतो असेही डॉ. शंतनू ओझरकर यांनी सांगितले.
यावेळी इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ.श्रद्धा कुंभोजकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com