शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध

Maharashtra-Rajya-Pariksha-Parishad-Pune. हडपसर मराठी बातम्या

Provisional answer list of scholarship exam published on the website

शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध

आक्षेप नोंदवण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदतMaharashtra-Rajya-Pariksha-Parishad-Pune. हडपसर मराठी बातम्या

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ.८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, असे परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

ही उत्तरसूची www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईनरित्या २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नोंदवता येतील.

ऑनलाईन निवदेन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये नोंदवता येईल. मुदतीनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

ऑनलाईन निवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन निवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग आदी दुरुस्ती करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अन्य कोणत्याही पद्धतीने तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही उपायुक्त श्री. राठोड यांनी कळविले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *