शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल

Union Home Minister Amit Shah inaugurated the first phase of 'Sarkarwada' शिवसृष्टीचा पहिला टप्पा 'सरकारवाडा' चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Shivashrithi will be Asia’s grandest theme park – Union Home Minister Amit Shah

शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल

-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारा सरकारवाडाUnion Home Minister Amit Shah inaugurated the first phase of 'Sarkarwada'
शिवसृष्टीचा पहिला टप्पा 'सरकारवाडा' चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण
हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : शिवाजी महाराजांनी संपूर्ण जीवन स्वराज्याच्या स्थापनेसाठी अर्पित करून येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वत:चा आदर्श ठेवल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात सांगितलं. पुण्याजवळील आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण शाह यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

अमित शाह पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे. हा विचार देशात सर्वदूर पसरवण्याचा वसा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर जपला. बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न असलेली शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आहे, याचा मला अभिमान वाटत असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं.

शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

शिवसृष्टीचा प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून श्री.शाह म्हणाले, पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले आहेत. इथे भेट देणारा शिवाजी महाराजांच्या जीवनातून मिळणारा संदेशही सोबत घेवून जाईल. शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल.

इतिहासातील सूक्ष्म बाबींना संशोधनपूर्वक मांडल्याने हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास आणि तंत्रज्ञानाचा सुंदर समन्वय इथे दिसून येतो. इतिहासाला जीवंत रुपात साकारण्याचा हा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या जीवनसंदेशाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. देशभरातील शिवभक्तांसाठी आणि जगभरातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्वाचे स्थळ होईल.

छत्रपती शिवरायांचे कार्य देशभरातील जनतेला प्रेरित करणारे आहे. हे कार्य घरोघरी पोहोचविण्यात शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांचे मोठे योगदान आहे. जगभरातील अधिकृत दस्तावेजाचे संकलन करून नव्या पिढीसाठी शिवचरित्राची रचना करून त्यांनी नव्या पिढीवर मोठे उपकार केले आहे. त्यांनी १२ हजारापेक्षा अधिक व्याख्याने आणि जाणता राजाचे १२०० पेक्षा अधिक प्रयोग करून शिवसृष्टीसाठी योगदान दिले. जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून युवकांवर देशभक्तीचे संस्कार प्रभाविपणे झाले.

शिवरायांचा आदर्श ठेऊन आम्ही राज्यकारभार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच या शिवसृष्टीचं उर्वरीत कामही वेळेवर पूर्ण होईल, त्यासाठी लागेल ती मदत राज्य सरकार करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

बाबासाहेब पुरंदरे यांनी ५० वर्षे शिवसृष्टीचं स्वप्न उराशी बाळगले होते. बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगात सर्वत्र पोहोचवण्याचं काम केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते पुढे म्हणाले की, हे स्वप्न पूर्ण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असून सरकारतर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.

ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारा सरकारवाडा

शिवसृष्टी हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्पा असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड व विशाळगड या गड-किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभविता येईल.

सरकारवाडा मधील ‘दुर्गवैभव’ विभागात आजच्या तरुण पिढीला आपला जाज्वल्य इतिहास तितक्याच प्रभावीपणे समजावा, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान होते अशा काही किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मॅपिंग केलेले असून यासाठी होलोग्राफी, ॲनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, ३ डी प्रोजेक्शन, मॅपिंग अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *